मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘जॉन अब्राहम’ने महाराष्ट्र सरकारच्या झाडं तोडण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या आगामी ‘बाटला हाऊस’ चित्रपटाच्या टिझर रिलीजवेळी जॉनला मेट्रोच्या कारशेडसाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीविषयी विचारण्यात आलं होत.
“महाराष्ट्र सरकारने मेट्रो 3 कारशेडसाठी आरे कॉलनीतील 33 हेक्टरवर पसरलेली हिरवळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत का, असा प्रश्न मला पडला आहे. झाडांच्या कत्तलीसह कोस्टल रोडलाही माझा विरोध आहे”. असं यावेळी जॉन म्हणाला.
दरम्यान, येत्या 15 ऑगस्टला ‘बाटला हाऊस’ चित्रपट रिलीज होणार आहे. 19 सप्टेंबर 2008 साली दिल्लीतील जामिया नगरातील एल-18 ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे.