#CWC2019 : फायनलनंतर आयसीसीच्या नियमावर मोहम्मद कैफची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – लंडन येथे रविवारी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यातील सामना “टाय” झाला, त्यानंतरही सुपरओवरमध्ये बरोबरी झाली. इंग्लंडने या सामन्यात 22 चौकार व 2 षटकार मारले तर न्यूझीलंडने 16 चौकार मारले. त्यामुळे जास्त चौकारांचा निकष लावत इंग्लंडला विजेतेपद देण्यात आले.

दरम्यान, सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाल्यास सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी हा आयसीसीचा नियम आहे. मात्र याच नियमावर विश्वचषकाच्या फायनलनंतर टीका होत आहे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणतो, “सर्वाधिक चौकारांचा नियम पचवण्यास कठीण जात आहे. सडनडेथसारखा कोणतातरी नियम हवा, ज्यामुळे निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात याव्या. एक संघ विजेता घोषित करण्याबाबत समजू शकतो, पण सर्वाधिक चौकारांच्या नियमाऐवजी दोघांना विभागून विजेतेपद देणे जास्त योग्य ठरलं असतं.”

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.