मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल करत असतात. त्याला शिवसेनेकडून कोणी फारसं महत्त्व देत नव्हतं. मात्र आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद भाजप आणि अमृता फडणवीस यांच्या आरे ला कारे करताना दिसून येत आहेत. दिपाली यांनी अमृता फडणवीस यांच्यासह देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
दिपाली सय्यद देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना अक्षेपार्ह ट्विट केलं आहे. अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला दिपाली यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ट्विटमध्ये दिपाली सय्यद ट्विटमध्ये म्हणाल्या की, “वजनदारने पुरणपोळी खाके हलकेसे वेगळा विदर्भ मांग्या, दुसरो को हल्का करने के चक्कर मे मामी का युसूफ लकडावाला से ढोंग्या. जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या, अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
वजनदारने पुरणपोळी खाके हल्केसे वेगळा विदर्भ मांग्या।
दुसरो को हल्का करने के चक्कर मे
मामी का युसुफ लकडावाल से ढोंग्या।
जिसको हल्के मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या। @ShivSena @fadnavis_amruta— Deepali Sayed (@deepalisayed) May 16, 2022
वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.