IPL 2024 Commentators : आयपीएल 2024 साठी स्टार समालोचकांची यादी जाहीर झाली आहे. जिओ सिनेमा (Jio Cinema) ने आपल्या हिंदी कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील माजी खेळाडू तसेच माजी आयपीएल स्टार , प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. IPL मधील पहिला सामना महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चा संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे.
हिंदी समालोचकांची यादी…
1. झहीर खान
2. इरफान पठाण
3. सुरेश रैना
4. आकाश चोप्रा
5. पार्थिव पटेल
6. आर पी सिंग
7. प्रज्ञान ओझा
8. निखिल चोप्रा
9. सबा करीम
10. अनंत त्यागी
11. रिद्धिमा पाठक
मराठी समालोचकांची यादी…
1. केदार जाधव
2. धवल कुलकर्णी
3. किरण मोरे
4. सिध्देश लाड
5. प्रसन्न संत
6. चैतन्य संत
7. कुणाल दाते
IPL 2024 Commentators full list#IPL2024 #IPLonJioCinema pic.twitter.com/2QRfAYLcI9
— Kuldeep Sharma 🇮🇳 (@Kuldeep55437535) March 19, 2024
दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयकडून (22 मार्च ते 7 एप्रिल) जाहीर करण्यात आले आहे. हे 21 सामने दोन आठवड्यांच्या कालावधीत होणार असून 10 शहरांमध्ये 21 सामने खेळवले जातील. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स आपला प्रारंभिक सामना विझागमध्ये खेळणार आहे. आयपीएल 2024 मधील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्घाटनाचा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. उर्वरित सामने दुपारी 3.30 किंवा 7.30 वाजता सुरू होतील.