कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकारला धोक्याची घंटा; ११ आमदारांचा राजीनामा

बंगळुरू – कर्नाटकातील जनता दल युनायटेड आणि काँग्रेसचे आघाडी सरकार धोक्यात आले असून राज्यातील जेडीएस व काँग्रेसच्या ११ आमदारांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांच्या कार्यालयामध्ये आपल्या आमदारकीचा राजीनामा सादर केला आहे. या वृत्ताला स्वतः राज्यपाल रमेश कुमार यांनी दुजोरा दिला असून यामुळे जनता दल युनायटेड-काँग्रेस यांच्या आघाडीत अखेर बिघाडी घडून आल्याचे अधोरेखित झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील जनता दल युनायटेड आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये वारंवार शाब्दिक खटके उडताना दिसत होते. काँग्रेस आमदारांच्या एका शिष्टमंडळाने तर लोकसभा निवडणुकांपूर्वी थेट काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत आपली खदखद बोलून दाखविली होती. मात्र पक्षश्रेष्ठींकडून त्यांचा आवाज दाबण्यात आला होता. अखेर आज या अंतर्गत वादाचे रूपांतर राजीनामासत्रात झाले असून महेश कुमाथल्ली, बी सी पाटील, रमेश जार्किहोली, शिवराम हिबर, एच. विश्वनाथ, गोपालिया, बिरथी बसवराज, नारायण गौडा, मुनीराथना, एस. सोमाशेकर व प्रताप गौडा पाटील या आमदारांनी आपला राजीनामा राज्यपाल रमेश कुमार यांच्याकडे सोपवला आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून आमदारांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक काँग्रेस व जेडीएस नेत्यांची धांदल उडाली आहे.

Karnataka Assembly Speaker Ramesh Kumar: I was supposed to pick up my daughter that is why I went home, I have told my office to take resignations and give acknowledgement. that 11 members resigned .Tomorrow is leave so I will see them on Monday. (file pic) pic.twitter.com/k4WQ2t0Wev

— ANI (@ANI) July 6, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.