पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे भारतातील पंजाबमध्ये जाति उमरा हे मूळ गाव आहे. येथील लोकांनी शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान व्हावे, अशी प्रार्थना काल केली होती. पाकिस्तानात इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नव्या पंतप्रधानाच्या निवडीसाठी संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांचे नाव पुढे आले आणि आज त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली.
यामुळे शरीफ कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या जाती उमरा येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या मूळ गावातील लोक ते पाकिस्तानचे पंतप्रधान व्हावेत यासाठी प्रार्थना करत होते. जाति उमरा हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पूर्वजांचे गाव आहे. गावचे सरपंच रचपाल सिंह, माजी सरपंच दिलबाग सिंह आणि जसपाल सिंह यांनी सांगितले की, रविवारी शरीफ कुटुंबाला गावातील गुरुद्वारा साहिबमध्ये अरदास देण्यात आली.
1932 मध्ये शरीफ कुटुंब आले होते लाहोरला –
मी नवाझ शरीफ यांना भेटलो नाही, पण त्यांच्या कुटुंबाची गावाशी असलेली ओढ मला चांगलीच ठाऊक आहे, असे वृद्ध ज्ञानसिंग यांनी सांगितले. 1932 मध्ये हे कुटुंब लाहोरला गेले. 1947 मध्ये देशाच्या फाळणीच्या वेळी दोन्ही देशांदरम्यान एक रेषा आखण्यात आली होती, परंतु जेव्हा-जेव्हा शरीफ कुटुंबावर संकट आले तेव्हा या गावातील गुरुद्वारा साहिबमध्ये कुटुंबाचा नैवेद्य दाखवण्यात आला. गुरुद्वारा साहिबचे कुलदीप सिंह, ग्रामीण लखा सिंह, निर्वैल सिंह, बचन सिंह आणि केवल सिंह यांनी सांगितले की, 1932 मध्ये शरीफ कुटुंब लाहोरला गेले तेव्हा त्यांनी तेथे कारखाना सुरू केला. देशाच्या फाळणीपूर्वी गावातील लोक त्यांच्या कारखान्यात काम करायचे.
शरीफ कुटुंबाने पाकिस्तानात उभारले जाती उमरा गाव –
शरीफ कुटुंबाला त्यांच्या मूळ गाव जाती उमरावर इतके प्रेम आहे की त्यांनी पाकिस्तानातील लाहोरजवळ 175 एकरमध्ये जाति उमरा वसवले आहे. शरीफ कुटुंबाने त्यांच्या वडिलोपार्जित गावाच्या स्मरणार्थ लाहोरजवळील त्यांच्या घराचे नाव जाति उमरा असे ठेवले आहे.