पोर्ट एलिझाबेथ – दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशचा दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल 332 धावांनी दणदणीत पराभव केला. या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने जिंकत यजमान दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला व्हाइटवॉश दिला. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने 220 धावांनी जिंकली होती. या दुसऱ्या कसोटीत केशव महाराजने अष्टपैलू खेळ करत सामन्याचा तसेच मालिकेचा मानकरी हा पुरस्कार पटकावला.
एकदिवसीय तीन सामन्यांची मालिका जिंकत बांगलादेशने इतिहास रचला होता. त्यामुळे कसोटी मालिकेतही ते चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.
या दुसऱ्या कसोटीत पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 453 धावा उभारल्या होत्या. त्यात केशव महाराजने 84 धावांची खेळी केली होती. त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 217 धावांत संपला. त्यात महाराजने 2 गडी बाद केले होते.
Utter demolition 👊
Keshav Maharaj completes his second seven-wicket haul of the series as South Africa bowl out Bangladesh for 80 and complete a 2-0 whitewash.
#SAvBAN | #WTC23 pic.twitter.com/Xxrh6uG2tW
— ICC (@ICC) April 11, 2022
दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव 6 बाद 176 धावांवर घोषित केला व बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या 80 धावांवर गुंडाळत मोठा विजय मिळवला. या डावात दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने 7 गडी बाद केले होते. संपूर्ण सामन्यात एक अर्धशतकी खेळी व 9 बळी त्याने घेतले. पहिल्या कसोटीतही त्याने 7 बळी मिळवले होते. त्यामुळे तो सामन्याचा तसेच मालिकेचाही मानकरी ठरला.