“जस्सी जैसी कोई नहीं’ ही सिरीयल आठवते आहे का, त्यातील मोठा चष्मा, दातांवर क्लीप आणि कोणतीही हेअर स्टाईल नसलेले केस असलेली जस्सी अर्थात मोना सिंहचे नुकतेच लग्न झाले. दक्षिण भारतातल्या शाम नावाच्या इन्व्हेस्टमेंट बॅंकर बरोबर तिचा शुभविवाह नुकताच झाला. लाल साडी आणि अंगभर दागिन्यांमुळे मोना सिंह अगदी नटली होती. “जस्सी’ मालिकेतला गौरव गेरा आणि रक्षदा खान हे देखील या विवाह समारंभाला आवर्जुन उपस्थित राहिले होते.
रक्षदा खानने या विवाहाच्यावेळचा एक व्हिडीओदेखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मेंदीच्यावेळच्या “ये लो उनमे हलका हलका गुरूर है’ या गाण्यावर तिने मोनाबरोबर ताल धरलेला दिसतो आहे. गुरुवारी मेंदी आणि संगीतचा मस्त कार्यक्रम रंगला होता. यावेळी खूप आनंदात असलेल्या मोना सिंहचे अनेक सेल्फीही रक्षदाने पोस्ट केले आहेत. मोना सिंहने यापूर्वी “मिशन ऑन मार्स’ या वेबसिरीजमध्ये काम केले होते. सध्या ती “कहने को हमसफर है’ या आणखी एका वेबसिरीजमध्ये काम करते आहे. तिने आपल्या अभिनयाच्या तारखा 14 डिसेंबरपर्यंतच दिल्या होत्या. त्याचे कारण तिच्या लग्नाची गडबड हे होते, ही बाब आता उघड झाली आहे.