सलमान आज त्याचा 54 वा वाढदिवस साजरा करतो आहे. या निमित्ताने त्याची बहिण अर्पिता आणि मेव्हणा आयुष शर्मा यांनी सलमानला एक छानसे गिफ्ट दिले आहे. अर्पिताने एका गोड मुलीला आजच्याच दिवशी जन्म दिला आहे. त्यामुळे सलमान भाईजान दुसऱ्यांदा मामा बनला आहे. अर्पिता आणि आयुष यांनी तीन वर्षांपूर्वी एका मुलालाही जन्म दिला आहे. सलमान आणि अर्पितामध्ये एक खास बॉन्ड आहे.
अर्पिता नेहमीच सलमानबरोबरचे फोटो शेअर करत असते. त्याच्याशी ती नेहमी मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते. सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशीच आपल्या दुसऱ्या आपत्याचा जन्म व्हावा, असे नियोजन अर्पिता आणि आयुषने केले होते. त्यानुसार अगदी 27 डिसेंबरला अर्पिताने सलमानला मामा बनवले आहे. वाढदिवशी सलमान मुंबईमध्येच आहे. त्याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही मोठ्या पार्टीचे नियोजन केलेले नाही. कारण त्याला आपल्या लाडक्या बहिणीजवळ तिच्या देखभालीसाठी रहायचे आहे. या नवजात बालिकेचे नाव अयात असे ठेवले असल्याचे समजते आहे. हे नावही कदाचित सलमाननेच सुचवलेले असू शकते.