Janhvi Kapoor – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या शिखर पहारियासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चर्चेनुसार, आता जान्हवी आणि शिखर यांच्यातील नात्याची पुष्टी झाली आहे. सोशल मीडियावर स्टार किड्स आणि मोठ्या स्टार्ससोबत दिसणारी ऑरीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यावर शिखर आणि जान्हवीच्या कमेंटने हे स्पष्ट झाले आहे की, दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे.
शिखर आणि जान्हवीच्या कमेंट वाचून चाहत्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की शिखरने आता पब्लिकली जान्हवीला त्याची गर्लफ्रेंड म्हणून घोषित केले आहे. यासोबतच शिखरने आता डेटींगच्या अफवांच्या दरम्यान जान्हवीसोबतच्या त्याच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.
ऑरीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये शिखर एका मुलीसोबत दिसत आहे. त्या मुलीने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना जान्हवीने लिहिले की, ‘ही मुलगी कोण आहे?’ ज्यावर ‘मी फक्त तुझाच…’ अशी कमेंट त्याने केली. शिखरच्या या कमेंटमुळे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे.
जान्हवीच्या वर्कफ्रंट बाबत सांगायचे झाल्यास , ती देवरा या चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. काही दिवसांपूर्वीच, अभिनेत्रीने या बहुप्रतिक्षित पॅन इंडिया प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले.