Entertainment । अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान जेव्हा जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा ते चर्चेत असतात. त्यांची जोडी आणि त्यांच्यातील रोमान्स या दोन्ही गोष्टी चाहत्यांना आवडतात. आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही रोमॅंटिक झाल्याचे दिसून येत आहे. करीन आणि सैफ एकमेकांना किस करताना दिसत आहे. दरम्यानची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दोघेही घरातून बाहेर आल्यावर थेट आपापल्या गाडीकडे गेले पण त्याआधी दोघांनी एकमेकांना जवळ घेत मिठी मारली. यानंतर करिनाने आधी सैफला त्याच्या कारमध्ये सोडले आणि नंतर तिच्या कारमधून निघून गेली. आता करीना कपूर आणि सैफ अली खानचा हा व्हिडिओ पाहून लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही तुमचे नाते असे जिवंत ठेवा.’ तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटले आहे, ‘परफेक्ट कपल.’ त्यांच्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 5 वर्षे लिव्ह-इन राहले त्यांनतर 2012 मध्ये या जोडप्याने कोर्ट मॅरेज केले होते. करिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘क्रू’मध्ये दिसली होती. त्याचवेळी सैफ अली खान ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरसोबत तेलुगू चित्रपट देवारामध्ये दिसणार आहे.