Adinath Kothare New Film| दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आगामी ‘शक्तिमान’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी झळकणार आहे. सोबतच बालकलाकार ईशान कुंटे या सिनेमातून पदार्पण करणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.
या पोस्टरमध्ये आदिनाथने सुपरमॅनच्या पाठीवर असलेला लाल रंगाचा क्रेप घातलेला असून ईशान आनंदाने हसताना दिसत आहे. “बाबा, तू होऊ शकतोस सुपरहिरो?” या टॅगलाईनने चित्रपटाच्या कथानकाविषयी प्रेक्षकांचे कुतूहल वाढवले आहे. आपले वडील सुपरहिरो व्हावे असं स्वप्न असणाऱ्या मुलाची गोष्ट यात असावी असा अंदाज या पोस्टरवरून लावला जात आहे. हे पोस्टर पहिल्यानंतर चित्रपटाबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी यांच्यासह प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती मोशनस्केप एन्टरटेनमेंटने केली आहे . येत्या २४ मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दिग्दर्शक प्रकाश कुंटे हे ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘अँड जरा हटके’, ‘हंपी’ आणि ‘सायकल’ सारख्या या चित्रपटांमुळे ओळखला जातो. या चित्रपटाचा ट्रेलर देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे आदिनाथ आणि स्पृहा पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. Adinath Kothare New Film|
हेही वाचा:
ममता बॅनर्जी यांना धक्का ; तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश