बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने इंडस्ट्रीमध्ये खूपच कमी वेळेत आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जान्हवी सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते आणि ती सतत आपले हॉट ऍण्ड ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.
View this post on Instagram
तसेच जान्हवीची छोटी बहीण खुशी कपूरने भलेही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले नसले, तरी आपल्या ग्लॅमरस शैलीमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. जान्हवी आणि खुशी कपूर सध्या दुबईमध्ये व्हेकेशनचा आनंद लुटत आहेत. या दोघींनी तेथील अनेक फोटो चाहत्यांशी शेअर केले आहे.
View this post on Instagram
हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी आणि खुशी खूपच हॉट अंदाजात दिसत आहे. या दोघी बहिणी तेथील वाळवंटात फिरताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये जान्हवी ब्राऊन टॅंक टॉप आणि शॉर्टसमध्ये दिसत आहे. तर खुशीनेही तिच्यासारखेच कपडे घातलेले आहेत. या दोघींचा लुक चाहत्यांना खूपच आवडला असून त्या स्टाइलीश लुकमध्ये जबरदस्त दिसत आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जान्हवी कपूर लवकरच “गुड लक जॅरी’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय तिने “दोस्ताना-2′ आणि “तख्त’मध्येही मुख्य भूमिका साकारली आहे.