टोकियो – जपानमधील काही शास्त्रज्ञांनी अतिशय थंड अशा कापडाची निर्मिती केली असून उन्हाळ्याच्या काळात हे कापड तब्बल 12.5 डिग्रीने थंड होते असा दावा संशोधकांनी केला आहे चीनमधील नानसिंग युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त प्रयत्नातून संशोधकांनी हे कापड निर्माण केले आहे उन्हाळी दिवसात घराबाहेर पडताना या कापडाने तयार केलेले कपडे परिधान केले तर शरीराचे तापमान नियंत्रित आणि थंड राहू शकते असेही या शास्त्रज्ञाने म्हटले आहे
सहसा उन्हाळ्यात शरीराचे आणि खोलीचे तापमान थंड ठेवण्यासाठी एसी फॅन आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला जातो त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा खर्च होतो शास्त्रज्ञांनी विकसित केलेला या कापडापासून तयार केलेले कपडे जर परिधान केले तर कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरणाशिवाय शरीराचे तापमान थंड राहणार आहे
आणि ऐन उन्हाळ्यामध्ये दिलासा मिळणार आहे ते कापड मूळचे सिल्क आहे सिल्क चे कापड नेहमी सूर्यकिरण परावर्तित करते या सिल्कच्या कापडामध्ये थोडे संशोधन करून या कापडावर पडणारी 95 टक्के सूर्यकिरणे परावर्तित करण्यात संशोधकांना यश आले आहे त्यामुळे आपोआपच शरीराचे तापमान न वाढता ते थंड राहते कापड तयार करत असताना त्यामध्ये अल्युमिनियम ऑक्साईडचे काही नॅनोपार्टीकल्स मिसळण्यात आले आहेत त्यामुळे या कापडावर पडणारी कोणतीही अतिनील किरणे किंवा इन्फ्रारेड किरणे किंवा सूर्यकिरणे परावर्तित होत आहेत
या कापडापासून तयार केलेला शर्ट जर कोणी परिधान केला आणि 40 अंश सेल्सियस असलेल्या तापमानात ती व्यक्ती उभी असेल तर त्याच्या शरीराचे तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत कमी असेल म्हणजेच या कापडामुळे उष्णतेचे प्रमाण किमान 10 ते 12 अंशाने कमी होते असा शास्त्रज्ञांचा दावा आहे