जामखेड – जीवघेण्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज जामखेड शहरासह तालुक्यात शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झालेले दिसत होते अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापा-यांनी आपली दुकाने बंद केली होती. जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी कडक बंदोबस्त ठेवला असुन स्वता पोलीस निरीक्षक पाटील सकाळपासून कर्मचार्यांबरोबर शहरात फिरून नागरिकांना बाहेर न येण्याचे आवाहन करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जनता कर्फ्यूचं आव्हान केल्यानंतर सबंध देशभरामध्ये याचं काटेकोर पालन केल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. तालुक्यातील नान्नज जवळा. खर्डा सह संपूर्ण शहरांमध्ये या कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिक घराबाहेर पडले नाहीत. मुख्य रस्त्यावर शुकशुकाट आहे. सतत गजबजलेले असणारे खर्डा चौक. जयहिंद चौक. बीड काॅनर. बस स्थानक परिसर कोर्ट रोड. तपनेश्वर रोड. मेन पेठ सुने झाले आहेत, एकही मनुष्य रस्तावर फिरताना दिसत नव्हते जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील.
सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, निलेश कांबळे. पोलीस हेड कॉन्स्टेबल बापु गव्हाने,पोलीस कॉन्स्टेबल संदिप आजबे, राहुल सपट. गणेश गाडे. संग्राम जाधव. गणेश साने. बाजीराव सानप. शेषराव म्हस्के. अल्ताफ शेख. सचिन सगर. गणेश साने. राजेंद्र गोंधळे यांच्यासह अहमदनगर येथील स्ट्रकिंग फोर्स जामखेड तालुक्यातील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे