श्रीनगर – जम्मू काश्मीर प्रेस क्लबमध्ये पत्रकारांची मोठी गटबाजी असल्याचा आरोप करीत तेथील प्रशासनाने या संस्थेला दिलेली सरकारी जागा आपल्या ताब्यात घेतली आहे. या प्रेस क्लबला दिलेली जमीन आणि त्यावरील जागा आता प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतली असून ती राज्य सरकारच्या ईस्टेट डिपार्टमेंटकडे सुपुर्त करण्यात आली आहे असे निवेदन प्रशासनातर्फे जारी करण्यात आले आहे.
काही अप्रिय घटना आणि पत्रकारांमधील गटबाजीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही पत्रकारांनी पोलिसांच्या मदतीने या प्रेसक्लबचा ताबा घेण्याचा प्रयत्न गेल्या शनिवारी केला होता. त्यामुळे तेथे मोठाच तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या संस्थेचे रजिस्ट्रेशनही प्रशासनाने निलंबीत ठेवले आहे.