जामखेड – अभियांत्रिकीच्या विद्यार्थीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील रसाळ नगर भागात घडली आहे. साक्षी दिलीप भोसले (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास साक्षी घरात एकटी होती. तिने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. जामखेड ग्रामीण रुग्णलायत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
साक्षी पुणे येथेअभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. जामखेड येथील नागेश विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक दिलीप भोसले यांची ती मुलगी होती. सोमवारी (दि.18) मृतदेहावर पाटोदा तालुक्यातील पारगाव येथे मुळ गावी सोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साक्षीच्या जाण्याने जामखेड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.