लखनौ – घरगुती वादातून महिला सहाय्यक प्राध्यापिकेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालौन जिल्ह्यातील ओराई भागात घडली. सौम्य बघेल (वय 30) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या सिटी कोतवाली भागातील डीव्हीसी महाविद्यालयात मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापिका होत्या. गुरुवारी सकाळी त्यांनी राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाअंती मृतदेह खाली अतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवला. मूळ लखनौची रहिवासी असलेल्या सौम्या बघेल शहरातील डीव्ही कॉलेजमध्ये मानसशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.
त्या शहरातील मोहल्ला रामनगर येथे भाड्याने राहत होत्या. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली. असिस्टंट प्रोफेसर सौम्या अविवाहित होत्या. 2017 पासून सौम्या डीव्हीसी कॉलेजमध्ये मानसशास्त्र विभागात कार्यरत होत्य़ा.