जकार्ता – इंडोनेशिया आपली राजधानी लवकरच बदलणार आहे. आता जर्काता ऐवजी नुसंतारा ही इंडोनेशियाची नवी राजधानी होणार आहे. राजधानी बदलण्यासंदर्भातील बिलाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
नव्या राजधानीच्या विकासासाठी 33 अरब डॉलर खर्च करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. नवी राजधानी नुसंतारा ईस्ट कालीमंतन परिसरात असणार आहे. हा परिसर बोर्निया द्वीप समूहाचा भाग आहे. इंडोनेशियाताल केंद्र सरकारचे सर्व मंत्रालय आणि परदेशी दूतावास येथे हलवण्यात येणार आहे. ही नवी राजधानी कधी तयार होणार? या विषयी अजून चित्र स्पष्ट झालेल नाही. परंतु याचे बांधकाम 2024च्या पहिल्या तिमाहीत होण्याची शक्यता आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी 2019 साली राजधानीचे स्थलांतर करण्यासंदर्भातील बिल संसदेत मांडले होते. यावर विचार करण्यासाठी एक स्पेशल कमिटीची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर हे बील तीन वर्षानंतर संसदेत मंजूर झाले आहे. नव्या राजधानीच्या ऍडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी ही स्टेट कॅपिटल ऑथेरिटी चीफकडे असणार आहे. तसे पाहिले गेल्यास बोर्नियो हा एक मोठा द्वीप आहे. नुसंतरा 2 लाख 56 हजार 142 हेक्टरमध्ये बांधण्यात येणार आहे.