रोम, (इटली) – इटलीच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज इटलीचे संरक्षण मंत्री गायदो क्रोसेट्टो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण आणि सुरक्षा विषयक भागीदारीविषयक चर्चेला पुढे नेण्याच्या मुद्यावर या चर्चेत अधिक भर देण्यात आला.
पोर्तुगाल आणि इटलीच्या चार दिवसांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जयशंकर काल इटलीमध्ये दाखल झाले. रोममध्ये आल्यानंतर त्यांनी इटलीच्या मंत्रिमंडळाबरोबर द्विपक्षीय चर्चाही केली. “एक्स’वरील पोस्टमध्ये जयशंकर यांनी या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. इटलीचे परराष्ट्र मंत्री ऍन्टोनिओ तजानी यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या मार्च महिन्यात भारत भेटीवर आल्या होत्या. तेंव्हापासून भारत आणि इटली दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना अधिक चालना मिळाली होती.