बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा लॉकडाऊनमुळे आपल्या कुटुंबीयांपासून दूर त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये अडकलेला आहे. त्याच्यासमवेत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज आणि सलमान खानची मैत्रीण युलिया वंतूरसुद्धा फार्महाऊसमध्ये आहेत.
काही दिवसांपूर्वीच इलिया वंतूरने लॉकडाऊनदरम्यान सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये कसा वेळ घालवत आहे याविषयी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आता जॅकलिन फर्नांडिजने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याद्वारे ती सलमानच्या फार्महाऊसवर आपला वेळ कसा घालवत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
या व्हिडिओमध्ये जॅकलिन कधी झाडांवर चढताना, तर कधी तेथील प्राण्यांची सेवा करताना दिसत आहे. या व्हिडिओची सुरुवात निर्सगरम्य सकाळी होतो, जिथे पक्षांचा किलकिलाट दिसतो. तसेच फार्महाऊसमध्ये इतर सदस्य नमाज अदा करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
@jacquelinef143 @vanturiulia @rahulnarainkanal @imkamaalkhan @niketan_m @waluschaa @abhiraj88
हा व्हिडिओ शेअर करताना जॅकलिनने तिच्या आयुष्यातील “एक छोटासा चित्रपट’ असे त्याचे वर्णन केले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे, “माझा छोटासा चित्रपटाचा आनंद घ्या’.
दरम्यान, यापूर्वी जॅकलिन फर्नांडिसने सलमान खानचा एक व्यायाम करताना एक फोटोही शेअर केला होता. तसेच सलमान खानने एक फोटो शेअर केला होता. ज्यात जॅकलिन सलमानचा व्यायाम करताना गुपचुप फोटो काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.