राहुरी -सध्या लॉकडाऊनच्या काळात सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली. मात्र काही तालुक्यात तहसीलदारांनी परवानगी नाकारल्यामुळे दारु विक्री बंद आहे. त्यामुळे अनेक जण नगरहून दारू खरेदी करून वाहतूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुरी पोलिसांनी नाकेबंदीच्या काळात पाच वाहने ताब्यात घेवून दारू जप्त केली आहे.
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलत देवून सरकारने दोन दिवसांपूर्वी दारू विक्रीला परवानगी दिली. मात्र प्रत्येक जिल्हा व तालुक्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निर्णय घेण्याचे अधिकारी सरकारने दिले आहेत. राहुरी तालुक्यातील तहसीलदार फसिओद्दीन शेख यांनी दारू विक्रीला परवानगी दिली नाही. हॉटेल व्यवसायिक चोरून लपून छूप्या मार्गाने दारूची तस्करी करत आहेत.
दुपारी चार वाजे दरम्यान राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर जिजाऊ चौक येथे राहुरी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यादरम्यान चारचाकी वाहनातून दारू तस्करी करत असताना वाहन क्रमांक (एम. एच. 17 बी.व्ही. 1446), (एम. एच. 17 बी. व्ही. 5943), (एम. एच. 17 ए. झेड. 9351), (एम. एच. 17 ए. झेड. 2242) तसेच (एम. एच. 17 बी. एक्स. 2021) ही पाच वाहने ताब्यात घेतली आहे.