मुंबई – प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला चित्रपटसृष्टीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री मानली जाते. मध्यंतरी ती कॅन्सरच्या आजाराशी लढा देत होती. मात्र या आजारावर मनीषाने मात केली असून पुन्हा आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच ती मुंबई विमानतळावर दिसली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात तिचे वय झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिच्या नैसर्गिक सौंदर्याची खूप प्रशंसा केली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये मनीषाने नेव्ही ब्लू टॉप आणि बेज पँट परिधान केली होती. तर यावर तिने निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. यावेळी तिने फोटोग्राफर्सना पोज ही दिल्या. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ’90 च्या दशकातील अभिनेत्री गोष्टच वेगळी होती.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘तुम्हाला म्हातारे झाल्याचे पाहून वाईट वाटले,’ तर तिसऱ्याने ट्वीट करत लिहिले की, ‘ती अजूनही खूप सुंदर दिसते. तिचे हसणे किती मोहक आहे, आजही ती किती तरुण आहे.’
View this post on Instagram
दरम्यान, मनीषाने 1991 मध्ये ‘सौदागर’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. 1991 च्या दशकात मोठ्या पडद्यावर हुकुमत गाजवणारी मनीषा कोईराला 2000 च्या दशकात फार दिसली नाही. 2012 मध्ये तिला ओव्हेरियन कर्करोगाचे निदान झाले आणि त्यातून ती बरी झाली. 2017 मध्ये “डियर माया’ या चित्रपटाने तिने पाच वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये पुन्हा पाऊल टाकले.
त्यानंतर तिने ओटीटीवरही कमबॅक केले आहे. मनीषा कोईराला ही कार्तिक आर्यनचा चित्रपट “शहजादा’मध्ये दिसली. हा चित्रपट ओटीटीवरदेखील प्रदर्शित झाला आहे.