मुंबई – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ क्लिप लोकशाही वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या व्हिडिओवर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे. अशात या मुद्यावरून वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.
Disgusted by the video of #KiritSomaiya exposed by a Marathi news channel. The self styled torchbearer of probity in governance has now been exposed. Those whose morals are questionable have been pretending to be arbiters of public morality. On one hand his party talks of ‘Beti…
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 17, 2023
वर्षा गायकवाड यांचे ट्विट
‘एकीकडे त्यांचा पक्ष ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’च्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे त्यांचे नेते नेहमीच अनैतिक वर्तन करताना आढळतात. त्यांची ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही घोषणा काही नसून ‘बेटीयों को भजपा नेताओं से बचाओ’ आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. आता आपल्याच एकावर कारवाई होणार की नाही? ‘