पाटणा – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हाट प्रोफाईल लोकांची चौकशी करत असताना तिकडे सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे.
रियाने सुशांतकडून पैसे घेतले होते व तिने संपूर्ण कुटुंबाशी असलेले त्याचे संबंध तोडून टाकले होते. इतकेच नव्हे, तर तिनेच त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नसल्याने आपण पाटण्यात तक्रार दाखल करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.