नगर – महिला दैनंदिन कामामुळे आपल्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करित असतात. महिलांच्या आरोग्याची तपासणी वारंवार होणे गरजेचे आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये नवनविन आरोग्य क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. या तंत्राचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या दर्जाची सेवा देणात यावी. आरोग्य सेवा देण्यात यावी महानगरपालिकेच्या कै.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची महिला प्रसुती मध्ये जिल्ह्यात ओळख आहे, असे प्रतिपादन संग्राम जगताप यांनी केले आहे.
सुपा एमआयडीसी येथील करिअर कंपनींच्या वतीने युवान संस्थेच्या माध्यमातून सुमारे 16 लाख रूपयाची अत्याधुनिक कलर डॉपलेट सोनोग्राफी मशिन बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटलला भेट देण्यात आली. या मशिनचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक समद खान, अजय चितळे, उबेद शेख, उपायुक्त प्रदीप पठारे, आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे, वैद्यकिय अधिकारी डॉ.सतिष राजूरकर, डॉ.वृषाली पाटील, डॉ. शिल्पा पाठक, डॉ.दिपमाला चव्हाण, डॉ. रेणुका जोशी, डॉ. भाग्यश्री हंभीरे, प्रसिध्दी अधिकारी दिंगबर कोंडा, करिअर मिडीया कंपनीचे गौतम साबळे, निलेश ढगे, युवान संस्थेचे संदीप कुसाळकर, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर म्हणाले की, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांना चांगल्या दर्जेच्या आरोग्य सेवा मिळाव्यात याकरिता मनपाच्या देशपांडे रुग्णालयाबे नेहमीच चांगले काम केले आहे. स्त्री प्रसुतीमध्ये आजही बाळासाहेब देशपांडे दवाखान्यामध्ये प्रसुतीसाठी मोठ्या प्रमाणात महिला येत आहेत. अत्याधुनिक सोनोग्राफी मशिनद्वारे बाळाची तपासणी केल्यामुळे बाळाचे सुक्ष व्यंग असतील तर ते निदर्शनास येतात त्यावर त्वरीत उपचार करता येतात.