मुंबई – शिंदे गटातील आमदारांना 50 खोक्यांची ऑफर दिली हे सत्य आहे. तुमच्या अनेक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाल्या आहेत. तुम्हाला या सगळ्यांना उत्तर द्यायचे होते तर त्याचदिवशी का नाही दिले, असा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धक्काबुक्की करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांना केला आहे.
दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात “५० खोके, एकदम ओके” अशा घोषणा केल्या होत्या. त्याच घोषणांना आज सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांनी “सचिन वाझेचे खोके, एकदम ओके, लवासाचे खोके, बारामती ओके”, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर झालेल्या राड्यावर सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.