नेवासा – युवा शक्तीला योग्य दिशा देण्याचे काम दैनिक प्रभात वृत्तपञ समुह आणि दिशा परिवार करत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन दैनिक प्रभात’चे समुह महाव्यवस्थापक बी.एल् स्वॉमी यांनी नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात रविवार (दि.१५) रोजी आयोजित व्यक्तीमत्त विकास व कुरिअर मार्गदर्शन शिबीरात बोलतांना केले.
व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध विनोदी लेखक कथा – कथनकार डॉ.संजय कळमकर,दैनिक प्रभात’चे वित्त विभाग प्रमुख रविकुमार इंडी,दिशा परिवाराचे प्रमुख राजीभाऊ चव्हाण,कॉ.स्मिता पानसरे,दैनिक प्रभात’चे नगर आवृती वृत्तसंपादक जयंत कुलकर्णी,ज्ञानेश्वर महाविद्यालयातील यश – संवाद विभागाचे प्रमुख प्रा.देविदास साळुंके आदी मान्यवर प्रभृती उपस्थित होते.
यावेळी बोलतांना महाव्यवस्थापक स्वॉमी पुढे म्हणाले की,दैनिक प्रभात परिवारासह दिशा परिवार महाराष्ट्रातील हुशार मुलांना शैक्षणिक कामासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मदत करुन हुशार व बुद्धीमान मुला – मुलींचे पैशांमुळे शिक्षण रोखू नये हा उदात्त हेतू समोर ठेवून युवा शक्तीला दिशा देण्याचे काम करत आहे हल्लीच्या युगात ग्रामिण भागातील हुशार विद्यार्थी शिक्षणासाठी मुकले जावू नये यासाठी नेहमीच दैनिक प्रभात आणि दिशा परिवाराचा सिंहाचा वाटा असल्याचे गैरोद्गारही यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना काढले.
यावेळी प्रसिद्ध विनोदी लेखक व कथाकथणकार संजय कळमकर यांनी दैनिक प्रभात वृत्तपञ समुह व दिशा परिवाराचे कौतूक करुन आपल्या शानदार भाषणात उपस्थित श्रोत्यांना धक्क्यावर धक्के देत आपल्या भाषणात खिळवून ठेवले अनेक वास्तव किस्सेंचा रतीब आपल्या श्रोत्यांपुढे मांडत समाज व्यवस्थेचे खुमासदार चिञण मांडत आपल्या शानदार भाषणात श्रोत्यांना यावेळी मंञमुग्ध केले.
यावेळी दिशा परिवाराचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी आपल्या दिशा परिवार व दैनिक प्रभात’च्या माध्यमातून मदत कशी केली जाते याची माहीती विषद केली याप्रसंगी अनेक विद्यार्थी – विद्यार्थींनींनी आपले मनोगत व्यक्त करतांना दैनिक प्रभात व दिशा परिवाराकडून झालेल्या मदतीमुळे अनेकांना आश्रू अनावर झाले या नेञदिपक व शानदार सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना एक आपुलकीची भावना व डोळ्यात आनंद आश्री येत असल्यामुळे कंठ दाटून आल्याचे चिञ या कार्यक्रमात दिसून आले. याप्रसंगी कॉ.स्मिता पानसरे,प्रा.देविदास साळुंके,माजी विद्यार्थी सुजित शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.
दैनिक प्रभात व दिशा परिवाराकडून मदत झालेल्या विद्यार्थींनी आपले मनोगत व्यक्त करतांना डोळ्यात आनंद आश्रू व कंठ दाटून येत असल्यामुळे उपस्थितांनाही आश्रू अनावर झाले कलियुगात सख्ये नातलगही मदत करतांना बहाने सांगत असतांना महाराष्ट्रातील हुशार व गरीब विद्यार्थ्यांना दैनिक प्रभात व दिशा परिवार मदत करत असल्यामुळे समाजातील श्रीमंत मंडळींनी याचा बोध घेण्याची नितांत गरज असल्याचा सुर उपस्थितांतून काढला जात होता.