आयटी हबमुळे हॉटेलिंग व्यवसायालाही बळ

बांधकाम व्यवसायाबरोबर खराडी भागात सगळ्यात मोठी इंडस्ट्री कुठली असेल तर हॉटेल इंडस्ट्री. अगदी छोट्या वडा-पावच्या टपरीपासून सप्ततारांकित हॉटेलांची एक साखळी उभी राहिली आहे. त्याचबराबेर आयटी कर्मचारी हा तरुण वर्ग असल्यामुळे त्यांना आकर्षित करणारे पब आणि रेस्टॉरंट याठिकाणी उभे राहिले आहेत.

या संदर्भात येथील काही हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, आयटी पार्कमुळे खूप बदल झाला आहे. फास्ट फुडला मागणी वाढली आहे. कामाच्या व्यस्त वेळा त्यामुळे घरी स्वयंपाक करणे शक्‍य नसल्याने अनेक जण रोज हॉटेलमध्ये जेवण करण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे अगदी छोट्यात छोट्या हॉटेल व्यावसायिकाचा सुद्धा दहा हजारांचा व्यवसाय होतो. मोठ्या हॉटेलांची उलाढाल ही रोज लाखोंमध्ये असते. त्यामुळे हॉटेलसाठी भाडेसुद्धा जास्त आहे. पब आणि रेस्टॉरंटसाठी महिन्याला दोन ते तीन लाख रुपयांचे भाडे स्वीकारले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.