सेल्फीवाल्यांसाठी वारी हौसेची

पालखी सोहळा हा “सेल्फी’वाल्यांसाठी उत्साहाचा सोहळा असतो. लाखोंच्या संख्येने सहभागी झालेले वारकरी, टाळ-मृदुंगाचा गजर, पालखीतील अश्‍व, नगारा आणि आकर्षक फूलांनी सजवलेल्या पालखीबरोबर स्वत:चा सेल्फी घेण्यासाठी तरूणांची धडपड पहायला मिळते. यावर्षीही दिंड्यांसमोर उभे राहून सेल्फी घेणे, हातात भगवी पताका, विणा आणि टाळ घेऊन फोटो काढणाऱ्या हौशी कलारांची गर्दी अधिक होती. तसेच, तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊलीबरोबर सेल्फी घेण्यात तरुणींची लगबग सुरू होती. काही तरुणी स्वत: डोक्‍यावर तुळशीवृंदावन घेऊन फोटो काढत होत्या. काही सेल्फी बहाद्दर पाटील इस्टेट चौकातील पुलावर धोकादायक पद्धतीने सेल्फी काढत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजही दिली. मात्र, सेल्फीचा मोह तरुणांना काही सुटत नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.