जपानमध्ये “जी-20′ परिषद सुरु

नवी दिल्ली – जपानमध्ये ओसाका “जी-20′ परिषद सुरु झाली आहे. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांची भेट घेतली आहे. यावेळी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी मोदींना लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादित करून पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.

दरम्यान, “जी-20′ परिषदेच्या निमित्ताने आज मोदी वेगवेगळ्या 10 द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यामध्ये फ्रान्स, जपान, इंडोनेशिया, अमेरिका आणि तुर्कीबरोबरच्या द्विपक्षीय चर्चेचा समावेश आहे. याशिवाय भारतासह ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण अफ्रिकेचा समावेश असलेल्या “ब्रिक्‍स’ देशांच्या नेत्यांचीही ते भेट घेणार आहे. या परिषदेमध्ये उर्जा सुरक्षा, दहशतवादाला विरोध आणि आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यार्पण आदी विषय ते या परिषदेमध्ये उपस्थित करण्याची शक्‍यता आहे. यावेळच्या परिषदेसाठी “मानव केंद्रीत भविष्यातील समाज’ असे ब्रीदवाक्‍य आहे. याच्याशीच संबंधित एक जाहीरनामाही या परिषदेदरम्यान प्रसिद्ध केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.