नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आता आकाशातील शुक्र ग्रहावर लक्ष केंद्रित केले असून लवकरच शुक्र मोहीम राबवण्यात येणार आहे चंद्रावरील आणि मंगळावरील अवकाश मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता इस्त्रोतर्फे आगामी कालावधीमध्ये शुक्रावर अवकाश यान पाठवण्यात येणार आहे.
ही मोहीम राबवण्यासाठी आणि अवकाशयान पाठवण्याची संपूर्ण क्षमता भारताकडे उपलब्ध असल्याची माहिती इसरोचे चेअरमन सोमनाथ यांनी दिली आहे शुक्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे आतापर्यंत उपलब्ध झालेला माहितीप्रमाणे शुक्रवरील वातावरण विषारी असून शुक्रावरील आकाशात सल्फरिक ॲसिडपासून तयार केलेले ढग आहेत शुक्रावर अवकाशात पाठवण्यासाठी कित्येक वर्ष संशोधन सुरू आहे होते.
आता या मोहिमेचा प्लॅन संपूर्णपणे तयार असल्याची माहिती सोमनाथ यांनी दिली आहे शुक्राला पृथ्वीचा जुळा ग्रह मानला जातो आकाराच्या बाबतीत शुक्र पृथ्वीप्रमाणेच आहे एकेकाळी शुक्रवरील वातावरण मानवी वस्ती साठी योग्य होते पण वातावरणातील बदलाचा फटका बसून शुक्रावरील वातावरण विषारी झाले असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे अमेरिका रशिया आणि चीन हे देश सुद्धा शुक्राचा अभ्यास करत असून त्यांच्याही मोहिमा येत्या काही कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहेत आतापर्यंत शुक्राबाबत जे संशोधन झाले आहे त्यापेक्षा वेगळे काही तरी संशोधन करण्याचा आमचा मानस आहेत अशी माहिती सोमनाथ यांनी दिली आहे