भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा “मिशन मंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकरत असून हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून करणार आहेत.
हा ट्रेलर अक्षयने शेअर केला असून ट्रेलर 2 मिनीट 52 सेकंदाचा आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा,शर्मन जोशी हे दिसून येत आहेत. मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आला आहे. यातच चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर चर्चा रंगत असून भारतीय अवकाश संसोधन संस्थेने या ट्रेलरचं ट्विट करत मिशन मंडळ चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे.
#MissionMangalTrailer beautifully shows the glimpses of emotions and passion with which #TeamISRO works
— ISRO (@isro) July 19, 2019
इस्त्रोने या ट्रेलरचे ट्विटद्वारे कौतुक केले आहे की,’ज्यांच्यासोबत इस्त्रोची टीम काम करते, त्या साऱ्यांच्या भावना आणि ध्येय ‘मिशन मंगल’च्या ट्रेलरमध्ये सुंदररित्या दाखविण्यात आल्या आहेत”, असं ट्विट इस्त्रोकडून करण्यात आलं आहे.’ दरम्यान, या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) या व्यक्तींची भुमिका साकारणार आहेत.