#ProKabaddi2019 : बंगळुरू बुल्सचा पाटणा पायरेट्सवर रोमहर्षक विजय

हैदराबाद – गतविजेत्या बंगळुरू बुल्सने पाटणा पायरेट्‌सवर 34-32 असा रोमहर्षक विजय मिळवित प्रो कबड्डी लीगमध्ये शानदार सलामी केली. गचीबावली स्टेडियमवर या स्पर्धेच्या सातव्या मोसमास शनिवारी प्रारंभ झाला.

बंगळुरू व पाटणा यांच्यातील सामनाही रंगतदार झाला. पाटणाने या स्पर्धेत तीन वेळा अजिंक्‍यपद मिळविले आहे. त्यांनी बंगळुरूच्या खेळाडूंना शेवटपर्यंत कौतुकास्पद लढत दिली. हा सामना बंगळुरू संघाला केवळ 2 गुणांनी जिंकता आला. त्यांच्याकडून पवनकुमारने चढाईत एक बोनस गुणासह 8 गुण मिळविले. अमित शेरॉनने 4 पकडी केल्या व एक बोनस गुण घेतला.सुमितसिंग, आशिषकुमार व महेंदरसिंग यांनी प्रत्येकी 4 गुण नोंदविले.

पाटणा संघाकडून मोहम्मद ईस्माईलने चढाईत 3 बोनस गुणांसह 7 गुण मिळविले तसेच त्याने 2 पकडीही केल्या. त्याचा सहकारी परदीप नरवालने 2 बोनस गुणांसह 10 गुणांची कमाई केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.