बेंगळु – “चांद्रयान-3’च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्तात “इस्रो’ने “आदित्य-एल-1′ या मोहिमेचा तपशील जाहीर केला आहे. सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अंतराळ मोहिमेसाठीच्या अवकाश यानाचे प्रक्षेपण 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अवकाश केंद्रातून केले जाणार आहे.
सूर्याच्या बाह्य आवरणाचे आणि सौर वाऱ्याचे अर्थात “एल-1’चे निरीक्षण करण्यासाठी “आदित्य एल-1′ हे अवकाश यान तयार करण्यात आले आहे. ‘आदित्य एल 1′ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले इस्रोचे हे पहिलेच मिशन आहे.
आदित्य एल1 हे सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅन्ग्रेस बिंदूच्या जवळ असलेल्या प्रभामंडल कक्षेत ठेवले जाईल. हे पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. “आदित्य एल1′ पॉईंटच्या जवळ असलेल्या हॅलो ऑर्बिटमध्ये उपग्रह स्थापित करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की,
येथून सूर्याचे सतत निरीक्षण केले जाऊ शकते आणि सूर्यग्रहणाचा त्यावर परिणाम होत नाही. सूर्याच्या हालचालींचे विश्लेषण आणि अवकाशातील हवामानावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करताना याचा मोठा फायदा होणार आहे.