मुंबई – भारताने इतिहास रचला आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगने जगाला भारतापुढे झुकावण्यास भाग पाडले आहे. चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल (LM) बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश असलेल्या लँडर मॉड्यूलने संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग केले.
या विक्रमासोबतच आणखी एक नवा विक्रम झाला आहे. इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर 8 दशलक्षाहून म्हणजेच तब्बल 80 लाखाहून अधिक लोक चांद्रयान-3 चे लँडिंग लाईव्ह पाहत होते, हा एक विक्रम आहे. यामुळे लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये जास्तीत जास्त वापरकर्ते मिळवणारे इस्रोचे चॅनल जगातील पहिले असे चॅनल बनले आहे.
चांद्रयान-3 च्या लँडिंगपूर्वी इसरोच्या यूट्यूब चॅनेलच्या सदस्यांची संख्या 2.68 दशलक्ष म्हणजे सुमारे 26 लाख होती, जी आता यशस्वी लँडिंगनंतर 35 लाख झाली आहे. सरासरी, केवळ एका तासाच्या लाइव्हमध्ये, सुमारे 10 लाख नवीन सदस्य इस्रोच्या चॅनेलमध्ये सामील झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पाच यूट्यूब चॅनेलबद्दल सांगणार आहोत ज्यांना लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
1. इस्रो (ISRO)
चांद्रयान-3 चे लँडिंग 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या अधिकृत चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले. सुमारे 1 तास 11 मिनिटे चाललेले हे थेट प्रक्षेपण रिअल टाइममध्ये 80 लाख लोकांनी पाहिले, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे.
2. कॅसिमिरो (CASIMIRO)
कॅसिमिरो हा एक स्पॅनिश युट्यूबर आहे जो गेमिंगबद्दल विनोदी व्हिडिओ बनवतो. 26 जून 2021 रोजी त्याने लाइव्ह स्ट्रीम केला जो 6.3 दशलक्ष म्हणजेच 63 लाख लोकांनी लाइव्ह पाहिला.
3. द ग्रिफजी (THEGREFG)
TheGrefg हा देखील एक स्पॅनिश युट्यूबर आहे जो गेमिंग सामग्रीबद्दल व्हिडिओ बनवतो. 11 जानेवारी 2021 रोजी त्याने एक लाइव्ह केला जो 2.5 दशलक्ष म्हणजेच 25 लाख लोकांनी रिअल टाइममध्ये लाइव्ह पाहिला.
4. ब्लॅकपिंक (BLACKPINK)
ब्लॅकपिंक हे दक्षिण कोरियन गर्ल ग्रुप चॅनल आहे जे पॉप गाणी अपलोड करते. 26 जून 2020 रोजी, ‘हाऊ यू लाइक दॅट’ हे गाणे या चॅनेलवर थेट प्रक्षेपित झाले, जे 1.9 दशलक्ष म्हणजेच 19 लाख लोकांनी थेट पाहिले.
5. बीटीएस (BTS)
BTS हे देखील एक लोकप्रिय दक्षिण कोरियन बॉय बँड चॅनल आहे. या चॅनेलवर 14 जून 2020 रोजी ‘बँग बँग कॉन- द लाईव्ह’ कॉन्सर्टचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, जे 1.7 दशलक्ष म्हणजेच 17 लाख लोकांनी थेट पाहिले होते.