नवी दिल्ली – काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत इस्रायलने मध्य आणि दक्षिण गाझामध्ये तुफान बॉम्बफेक केली. युद्धाच्या प्रंभीच्या काळात इस्रायलच्या सैन्याने पॅलेस्टिनींना ज्या भागात आश्रय घेण्याची सूचना केली होती, तेथेच ही बॉम्बफेक केली गेली. मध्य गाझामध्ये उभारण्यात आलेल्या बुरेजी शरणार्थ्यांच्या छावणीवर हा मारा केला गेल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. इस्रायलच्या विमानांनी ज्याप्रमाणे गाझाच्या अन्य बागात आतापर्यंत बॉम्बफेक केली होती, त्याचप्रमाणे छावणीच्या पूर्वेकडील भागात जोरदार बॉम्बफेक केली.
या भागात १९४८ मध्ये इस्रायलने शरणार्थ्यांसाठी घरे बांधली आहेत. हा भाग गाझामधील दाट लोकवस्तीप्रमाणेच आहे. बॉम्बफेकीमुळे या भागातील मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद पडली होती.
उत्तर गाझामधील बहुतेक रहिवाशांमध्ये जसे भीतीचे वातावरण निर्माण झाले, तसेच आता दक्षिण आणि मध्य गाझामधील रहिवाशांमध्येनिर्माण झाली आहे. या बॉम्बफेकीमुळे मध्य गाझातील अनेक इमारती जमिनदोस्त झाल्याचे वृत्त आहे. मध्य गाजामधील पॅलेस्टिनींनी देखील आता तेथून दुसरीकडे आश्रय घ्यावा, अशी सूचना इस्रायलच्या सैन्यदलाच्यावतीने देण्यात आली होती. युद्ध सुरू होण्यापूर्वी मध्य गाझामध्ये सुमारे ९० हजार पॅलेस्टिनींचे वास्तव्य होते. आता त्यामद्येतब्बल ६१ जार विस्थापितांची भर पडली आहे. /पैकी बहुसंख्य उत्तर गाझामधून आलेले आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे.
हमासचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आणि ७ ऑक्टोबरसारखा हल्ला पुन्हा होऊ नये म्हणून हे हल्ले आणि पायदळाची कारवाई आवश्यक असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
गाझामधील २३ लाख लोकसंख्येपैकी जवळपास दोन तृतीयांश लोक घरदार सोडून दक्षिणेकडे पळून गेले आहेत. गाझातील मृतांची संख्या २० हजार ९०० च्या आसपास पोचली आहे. गाझातील एक चतुर्तांश भूभाग इस्रायलच्या ताब्यात आला आहे. तेथेच केवळ अन्न, औषधे आणि अन्य मदत साहित्य पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाने म्हटले आहे. / युद्धात सामान्य नागरिकांची जीवितहानी होऊ नये.याची काळजी घेम्याची सूचना अमेरिकेने इस्रायलला केली आहे. तर युद्धबंदी लागू करण्यासाठी इस्रायलवर आंतररा,ट्रीय दबाव येतो आहे. मात्र अजूनही इस्रायलकडून हल्ल्यांची तीव्रता कमी केली जात नाही आहे.