नवी दिल्ली – हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेबाबत वाटाघाटी झाल्या तर आगामी रमझान महिन्यात इस्रायलकडून युद्ध थांबवण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धविरामाच्या प्रस्तावावर अमेरिका, इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीने चर्चा सुरू आहे. या प्रस्तावात हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायलींपैकी काही जणांंच्या सुटकेच्या मुद्यावरही विचार केला जातो आहे.
याबदल्यात इस्रायलच्या तुरुंगातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका आणि किमान ६ आठवड्यांच्या युद्धविरामाची अट इस्रायलला मान्य करावी लागणार आहे. या युद्धविरामाच्या कालावधीतच उर्वरित ओलिसांच्या सुटकेसाठीची चर्चा सुरूच राहणार आहे.
जर युद्धविरामाबाबतच्या वाटाघाटी वेळेत पूर्ण झाल्या तर १० मार्चपासून सुरू होणार्या रमझान महिन्यात युद्धविराम लागू होऊ शकतो, असेही बायडेन यांनी म्हटले आहे.