पाकिस्तानात इस्लामी कट्टरवादी-पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष; भारतातून गेलेले शीख भाविक अडचणीत

लाहोर – फ्रान्सच्या दूतांची पाकिस्तानातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या इस्लामी कट्टरवादी गटाच्या कार्यकर्त्यांबरोबर पोलिसांचा जोरदार संघर्ष झाला. पाकिस्तानातील काही शहरांमध्ये एकाचवेळी ही संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्समध्ये वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आल्याने काही इस्लामी राजकीय पक्षांनी फ्रेंच दूतांची हकालपट्टी करण्याचा आग्रह धरला आहे.

मंगळवारी झालेल्या संघर्षामध्ये तेहरीक ए लबाईक पाकिस्तान या पक्षाचे 9 कार्यकर्ते पोलीस गोळीबारात ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर 1 पोलीस कर्मचारीही ठार झाला. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी पंजाब प्रांतातील काही शहरांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

या हिंसाचारामुळे पाकिस्तानातील रस्ते वाहतूक खंडित झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानात गेलेले आठशे भारतीय शीख अडचणीत आले आहेत. बैसाखी उत्सवानिमित्त पंजाब प्रांतातील पंजा सहिब हसनबादल येथे हे शीख भाविक गेलेले होते. मात्र हिंसाचारामुळे ते तेथे पोहोचू शकले नाहीत.

मंगळवारी दुपारी हे शीख भाविक 25 बस मधून गुरुद्वारा पंजा साहेब हसनबादल येथे जाण्यासाठी रवाना झाले होते. मात्र ते प्रत्यक्षात गुरुद्वारामध्ये पोहोचू शकलेले नाहीत. भाविक लवकरच गुरुद्वारात पोहोचतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय शीख भाविक दहा दिवस पाकिस्तानच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि ते पंजाब प्रांतातील काही तीर्थक्षेत्रांना भेटी देणार आहेत.

फ्रान्समध्ये वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केले गेल्याने फ्रेंच राजदूतांची हकालपट्टी करण्यात यावी आणि पाकिस्तान फ्रान्समधून होणारी आयात थांबवावी अशी मागणी तेहरीक ए लबाईक पाकिस्तान पक्षाकडून केली जात आहे. या पक्षाला सत्तेत सहभागी करून घेण्याबाबत पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक करार केला होता. 

या कराराची तीन महिन्यांची मुदत संपत असतानाच तेहरीक ए लबाईक पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यातूनच हा हिंसाचार भडकला आहे. तेहरीक ए लबाईक पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांवर हत्या आणि दहशतवादाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. 

लाहोर आणि पंजाब प्रांतातील अन्य शहरांबरोबर कराची आणि अन्यत्रही हिंसक घटना घडत आहेत. या आंदोलनाच्या दडपण यापुढे सरकार चुकणार नाही असे विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचे अंतिय मंत्री हवा द चौधरी यांनी सांगितले

दरम्यान जोपर्यंत फ्रेंच राजपुतांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे तहरीक ए लबाईक पाकिस्तान पक्षाचे प्रवक्ते तय्यब रिसबूड यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.