करोना महामारीमुळे चाळीस टक्के लोकांना निद्रानाशाचा विकार

वॉशिंग्टन – गेल्या वर्षभराच्या कालावधीत जगाला सतावून सोडणाऱ्या करोना महामारीमुळे जगातील सुमारे चाळीस टक्के लोकांना निद्रानाशाचा विकार जडला आहे. रॉयल फिलिप या नावाच्या संस्थेने जगातील 13 देशांमधील शेकडो लोकांशी चर्चा करून जो सर्वे केला त्या सर्व तील निष्कर्षात प्रमाणे तब्बल 37 टक्के लोकांनी आपल्याला पूर्वीप्रमाणे झोप येत नाही याची कबुली दिली आहे.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 70 टक्के युवकांनी अशी माहिती दिली की करोना संकटाला प्रारंभ झाल्यानंतर त्यांना झोपेशी संबंधित अनेक विकारांशी सामना करावा लागला अशा प्रकारचे समस्यांचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असल्याचेही समोर आले आहे. जगभरातील स्लीप न्यूरोलॉजिस्टनी या आजाराला कोविडसोमनिया असे नाव दिले आहे.

अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या म्हणण्याप्रमाणे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती आपल्या कुटुंबीयांची चिंता यामुळे लोकांमध्ये निद्रानाशाचा विकार वाढत चालला आहे. एक तर अनेक लोकांना रात्रभर झोपच येत नाही किंवा मध्येच झोप भंग होत असल्यामुळे नंतर परत झोप लागत नाही. लोकांना जर झोप व्यवस्थित लागावी असे वाटत असेल तर त्यांनी योग्य व्यायाम करावा, झोपण्यापूर्वी मोबाइलचा वापर करू नये. दिवसभरात चहा किंवा कॉफी यासारखे पेयपान करू नये, आणि आपण ज्या खोलीत झोपत आहोत त्या खोलीचे तापमान व्यवस्थित ठेवावे अशा प्रकारच्या सूचना काही तज्ञांनी केलेल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.