देशातील ‘या’ दोन राज्यांत इसिसचे जाळे – संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली – भारतामध्ये केरळ आणि कर्नाटकात मोठ्या संख्येने इसिसचे दहशतवादी असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादावरील अहवालात देण्यात आला आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये अल कायदाचे 150 ते 200 दहशतवादी त्या भागात हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

इसिस, अल कायदा यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि संशयीत यांच्यावर लक्ष ठेवून हा 26वा विश्‍लेषणात्मक अहवाल तयार करण्यात आला आहे. अल कायदा ही संघटना भारतीय उपखंडात तालिबानच्या छत्राखाली अफगाणीस्तानमधील निमरूझ, हेलमंड आणि कंधार प्रांतात कार्यरत आहे.

अल-कायदाकडे सध्या भारत पाकिस्तान, म्यानमार आणि मुख्यत्वे बांगलादेशातील 150 ते 200 सदस्य आहेत. त्यांचे नेतृत्व ओसामा महमूद करत आहे. त्याने असीम उमरकडून ही सूत्रे स्वीकारली आहेत. उमरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या भागात दहशतवादी कारवाया घडवण्याचा कट रचला जात आहे.

भारतातील अल कायदाच्या दहशतवाद्यांचा गट स्थापन केला आहे. त्यात 150 ते 200 सदस्य आहेत. 10 मे 2019 रोजी या गटाची स्थापना करण्यात आली आहे, असे त्यात म्हटले आहे.
कर्नाटक केरळात इसिसचे जाळे

लष्कर आणि सुरक्षा दलांत काश्‍मिरात चकमक उडाल्यानंतर गेल्या महिन्यात भारतात नवीन प्रांत काबीज केल्याचा दावा प्रथमच इसिसने केला होता. या दहशतवादी संघटनेच्या बातम्या देणाऱ्या अमक न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, इसिसच्या विलायाह हिंद (भारत प्रांत) असे आहे. मात्र जम्मू काश्‍मिरमधील पोलिसांच्या वरीष्ठ धिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.