“पिंजर’, “सलाम ए ईश्क’ आणि “एक विवाह ऐसा भी’ सारख्या सिनेमांमधून काम केलेल्या ईशा कोप्पीकरने एका सुपरस्टारबाबतच्या आपल्या वाईट अनुभवाची उजळणी केली आहे. सिनेसृष्टीमध्ये नवीन असताना या सुपरस्टारने आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता, असे ईशा म्हणाली. एका सिनेमाच्या संदर्भात एका डायरेक्टरने या सुपरस्टारला फोन करण्याची सूचना केली. त्या सुपरस्टारच्या “गुड बुक्स’मध्ये तुला यावे लागेल, असे तिला सांगितले गेले होते.
त्याप्रमाणे तिने या सुपरस्टारला फोन केला. त्याने डबिंगच्या दरम्यान भेटायला बोलावले. त्याने एकटीच ये असेही सांगित्ले होते. त्यावेळी ईशा अगदी 15-16 वर्षांची असेल. पण काही तरी धोका आहे, असे जाणवल्याने तिने भेटायला जाणे टाळले आणि सिनेमातला रोल गुणवत्तेच्या आधारे मिळायला हवा, असे डायरेक्टरला सांगितले. माझ्यावर दबाव टाकला जाऊ शकणार नाही, असेही तिने निक्षुन सांगितले होते. भविष्यातही आपण त्या सुपरस्टारबरोबर कधीही काम केले नाही असेही ईशाने सांगितले. मात्र आपल्या या अनुभव कथनामध्ये तिने या सुपरस्टारचे नाव काही सांगितले नाही.