sharad pawar । भाजपने नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचाही समावेश आहे.
तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. शारदा पवार माढातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांवर खुद्द शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
sharad pawar । नेमकं काय म्हणाले शरद पवार
‘मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही’ असं स्पष्ट केलं आहे. माढातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता.
हे वाचले का ? पुणे,बीड, सांगली…महाराष्ट्रातील ‘भाजप’ कोणकोणत्या जागेवर मारणार बाजी ?