मुंबई – आनंद राठी वेल्थ या कंपनीचा आयपीओ 2 डिसेंबर पासून 6 डिसेंबर पर्यंत उपलब्ध होणार आहे.
या आयपीओमधील शेअरची किंमत 530 रुपये ते 550 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रवर्तकाकडे असलेले 1.2 कोटी शेअर गुंतवणूकदारांना उपलब्ध करण्यात येणार आहेत.
कंपनीच्या कर्मचाऱ्यासाठी अडीच लाख शेअर राखून ठेवण्यात आले आहेत. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 606 कोटी रुपये उभे करणार असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.