मुंबई – आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वेळेत षटके पूर्ण केली नाहीत, त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार लोकेश राहुल याला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलव्यतिरिक्त संघातील अन्य खेळाडूंना सहा लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
लखनौ संघाला यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही दंड ठोठावण्यात आला होता. त्या सामन्यातही वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे राहुलला 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता.
लखनौच्या संपूर्ण टीमला दंड
कर्णधार राहुलसह लखनौच्या उर्वरित खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे. प्रत्येक खेळाडूला मॅच फीच्या 25 टक्के किंवा 6 लाख रुपये यापैकी जे कमी असेल तो दंड भरावा लागेल. आयपीएलने जारी केलेल्या प्रकाशनात असे सांगण्यात आले की, लखनौचा संघ या हंगामात दुसऱ्यांदा निर्धारित वेळेत 20 षटकेही पूर्ण करू शकला नाही.
दरम्यान, चालू हंगामातील आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्धच्या झालेल्या सामन्यात लोकेश राहुल याला गैरवर्तन केल्यामुळे सामना रकमेच्या 20 टक्के दंड करण्यात आला होता.