बेंगळुरू – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू (आरसीबी) संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू फाफ डुप्लेसी करणार आहे. त्याच्या नेतृत्वावर माजी कर्णधार विराट कोहलीने विश्वास व्यक्त केला असून तो यंदाच्या स्पर्धेत संघाला उत्तूंग यश मिळवून देइल, असेही कोहली म्हणाला.
यंदाच्या स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात डुप्लेसिला खरेदी करताना संघाची रणनिती स्पष्ट होती. फाफ हा दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाबाबत संगात उत्साहाचे वातावरण आहे. आमच्या सर्वांसोबत त्याचे चांगले नाते आहे. मला आशा आहे की मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि इतर सगळे संघ सहकारी त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास उत्सूक आहेत, असेही कोहलीने सांगितले.