चेन्नई – शाळेच्या बसमध्ये शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी चक्क दारू पार्टी करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हे विद्यार्थी तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
बसमधील एका विद्यार्थ्यानेच हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये मुले आणि मुली बिअरच्या बाटल्या थेट तोंडाला लावल्याचे दिसत आले.
हे सर्व विद्यार्थी चेंगलापट्टू येथील सरकारी शाळेतील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तामिळनाडूच्या शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिडीओतील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात येणार आहे.
आता या विद्यार्थ्यांना निलंबीत केले जाईल किंवा त्यांना आणखी एक संधी देण्यात येईल याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. तसेच या मुलांच्या हाती दारू कशी लागली याचा देखील तपास केला जाणार आहे. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांकडून असे वर्तन घडल्याचे पाहून पालकांमध्ये चिंता वाढली आहे.