दुबई – आयपीएल स्पर्धेत आज क्रमवारीतील अव्वल संघ दिल्ली कॅपिटल्स संघाशी राजस्थान रॉयल्सचा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्याचे आव्हान राजस्थानसमोर आहे.
दिल्ली विरूध्द राजस्थान या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बाजूने लागला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#DelhiCapitals win the toss and they will bat first against #RajasthanRoyals.#Dream11IPL pic.twitter.com/kKiNOpgHvP
— IndianPremierLeague (@IPL) October 14, 2020
स्पर्धेत गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या तर राजस्थानचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने आतापर्यंत सात सामन्यापैकी 5 सामन्यात विजय मिळविला आहे तर दुसरीकडे राजस्थान संघाला सात सामन्यापैकी 3 सामन्यातच विजय मिळविता आला आहे.