मुंबई – गेल्या 24 तासात राज्यात 98 पोलीसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर एका पोलीसाचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्र पोलीस विभागातील 2052 कर्मचारी सक्रिय बाधीत असून उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 263 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत पोलीस विभागातील 25232 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर त्यापैकी 22917 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
महाराष्ट्र पुलिस विभाग में पिछले 24 घंटों में 98 नए कोविड मामले और 1 मौत दर्ज़ की गई। विभाग में सक्रिय मामलों की संख्या 2,052 हो गई, मरने वालों का आंकड़ा 263 है : महाराष्ट्र पुलिस pic.twitter.com/I3V65V0xST
— ANI_HindiNews (@AHindinews) October 14, 2020
दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यास मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 65 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य
सरकारकडून 50 लाख रुपये आणि एका वारसाला नोकरी, तसेच मुंबई पोलीस फाऊंडेशन तर्फे 10 लाख आणि खासगी बॅंक विमाकवचच्या माध्यमातून 5 लाख रुपये मदत दिली जाणार असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी सांगितले आहे.