#IPL2019 : मुंबई इंडियन्सचे राजस्थान रॉयल्ससमोर 162 धावांचे आव्हान

जयपुर – आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होत असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या 64 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्ससमोर 162 धावांचे आव्हान उभारले आहे.

राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. मुंबईचा सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 5 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव याने क्विटंन डी कॉक याला साथ देत दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. क्विटंन डी कॉकने 47 चेंडूत 65 आणि सूर्यकुमारने 33 चेंडूत 34 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 23 धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सकडून श्रेयस गोपालने 2 तर स्टुअर्ट बिन्नी,जोफ़्रा आर्चर आणि जयदेव उनादकटने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.